मंगळवार, २३ जून, २००९

एक वेगळा अनुभव....

मी माझ्या मित्रांसोबत ह्या देशाची राजधानी फिरून परत येत होतो तेव्हा रेल्वे स्थानकावर घडलेला हा प्रसंग.

आमच्या सोबत एका मित्राची बायकोही होती. स्टेशनवर आम्ही एकमेकांची मस्ती करत होतो व हसत होतो तेव्हा आमच्या बाजूला एक स्थानिक महिला उभी होती. अत्तापार्येंत मी पाहिलेले येथील स्थानिक लोक हे कमी बोलणारे व स्वतःच्यात मग्न असणारे असे होते.
थोड्या वेळानी त्या महिलेने माझ्या मित्राच्या बायकोशी संभाषण सुरु केले. मित्राची बायको चांगली शिकलेली आहे तरीही जरा भांबावली व वळून आपल्या नवर्याकडे पाहून हसली ते पाहून माझा मित्रहि त्यांच्या संभाषणात सामील झाला. ती महिला मग आमच्या सोबतहि संभाषण करू लागली.
ती आमच्या बद्दल माहिती विचारू लागली कि आम्ही इतक्या लांब कसे काय आलो ? आम्हाला त्यांची संस्कृतीची माहिती आहे का ? आम्ही भारतात कसे राहतो ? इ. हे सगळे चालू असताना काही मित्र आपल्या भाषेत आम्हाला सांगू लागले कि हिला जास्त उत्तर देऊ नका कारण बहुतेक हि प्यायलेली आहे.
पुढे त्या महिलेने आमच्या मित्राला विचारले कि त्याचे व तिचे काय नाते आहे ? त्यावर मित्राने तो तिचा नवरा असल्याचे सांगितले. त्या महिलेने त्याच्या बायकोला प्रश्न केला कि आपले दोन महिलांचे संभाषण चालू असताना ह्याने मध्येच येऊन संभाषण तोडावे हे तिला कसे काय चालते ?
व एक महिला म्हणून तिने तिच्या सोबत संभाषण सुरु केले होते कारण तिच्या मते अजूनही पुरुषांचे प्रस्त फार आहे व फार क्वचित महिला बाहेर दिसतात.
तेवढ्यात आमच्या नशीबाने ट्रेन येताना दिसली. आम्ही आमचे सामान उचलत होतो तेवढ्यात ती डोळे पुसत म्हणाली कि 'I am sorry but you were laughing on me.' (तुम्ही माझ्यावर हसत होतात ह्याचे मला वाईट वाटते.)
आम्ही सर्व चकित झालो पण ट्रेन आली होती म्हणून घाईने त्यात चढलो (पण आमच्या समोरचा दरवाजा मुद्दाम टाळला कारण ती महिला त्यात चढली होती).

ह्या सर्व घटनेत आम्हा सर्वांच्या चुकी मुळे त्या महिलेच्या मनात भारतीयांबद्दल वाईट छबी बनली असेल.


माझ्या मते जर आमच्यातल्या काहींनी व मुख्य करून माझ्या मित्राच्या बायकोने तिच्या प्रश्नांना चांगल्या प्रकारे उत्तर दिले असते तर हीच छबी चांगली बनली असती.
मुख्य म्हणजे मला एका गोष्टीचे नवल वाटते कि जेव्हा आपण एखाद्या बरोबर बोलत असतांना त्याच्या समोर उभेराहून तोंड लपवून हसू नये एव्हडे सामान्य ज्ञान देखील आमच्यातल्या बहुतेकांना एकतर माहित नव्हते किंवा त्याचे महत्व पटले नव्हते.


आपला मित्र......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा