मंगळवार, २३ जून, २००९

एक वेगळा अनुभव....

मी माझ्या मित्रांसोबत ह्या देशाची राजधानी फिरून परत येत होतो तेव्हा रेल्वे स्थानकावर घडलेला हा प्रसंग.

आमच्या सोबत एका मित्राची बायकोही होती. स्टेशनवर आम्ही एकमेकांची मस्ती करत होतो व हसत होतो तेव्हा आमच्या बाजूला एक स्थानिक महिला उभी होती. अत्तापार्येंत मी पाहिलेले येथील स्थानिक लोक हे कमी बोलणारे व स्वतःच्यात मग्न असणारे असे होते.
थोड्या वेळानी त्या महिलेने माझ्या मित्राच्या बायकोशी संभाषण सुरु केले. मित्राची बायको चांगली शिकलेली आहे तरीही जरा भांबावली व वळून आपल्या नवर्याकडे पाहून हसली ते पाहून माझा मित्रहि त्यांच्या संभाषणात सामील झाला. ती महिला मग आमच्या सोबतहि संभाषण करू लागली.
ती आमच्या बद्दल माहिती विचारू लागली कि आम्ही इतक्या लांब कसे काय आलो ? आम्हाला त्यांची संस्कृतीची माहिती आहे का ? आम्ही भारतात कसे राहतो ? इ. हे सगळे चालू असताना काही मित्र आपल्या भाषेत आम्हाला सांगू लागले कि हिला जास्त उत्तर देऊ नका कारण बहुतेक हि प्यायलेली आहे.
पुढे त्या महिलेने आमच्या मित्राला विचारले कि त्याचे व तिचे काय नाते आहे ? त्यावर मित्राने तो तिचा नवरा असल्याचे सांगितले. त्या महिलेने त्याच्या बायकोला प्रश्न केला कि आपले दोन महिलांचे संभाषण चालू असताना ह्याने मध्येच येऊन संभाषण तोडावे हे तिला कसे काय चालते ?
व एक महिला म्हणून तिने तिच्या सोबत संभाषण सुरु केले होते कारण तिच्या मते अजूनही पुरुषांचे प्रस्त फार आहे व फार क्वचित महिला बाहेर दिसतात.
तेवढ्यात आमच्या नशीबाने ट्रेन येताना दिसली. आम्ही आमचे सामान उचलत होतो तेवढ्यात ती डोळे पुसत म्हणाली कि 'I am sorry but you were laughing on me.' (तुम्ही माझ्यावर हसत होतात ह्याचे मला वाईट वाटते.)
आम्ही सर्व चकित झालो पण ट्रेन आली होती म्हणून घाईने त्यात चढलो (पण आमच्या समोरचा दरवाजा मुद्दाम टाळला कारण ती महिला त्यात चढली होती).

ह्या सर्व घटनेत आम्हा सर्वांच्या चुकी मुळे त्या महिलेच्या मनात भारतीयांबद्दल वाईट छबी बनली असेल.


माझ्या मते जर आमच्यातल्या काहींनी व मुख्य करून माझ्या मित्राच्या बायकोने तिच्या प्रश्नांना चांगल्या प्रकारे उत्तर दिले असते तर हीच छबी चांगली बनली असती.
मुख्य म्हणजे मला एका गोष्टीचे नवल वाटते कि जेव्हा आपण एखाद्या बरोबर बोलत असतांना त्याच्या समोर उभेराहून तोंड लपवून हसू नये एव्हडे सामान्य ज्ञान देखील आमच्यातल्या बहुतेकांना एकतर माहित नव्हते किंवा त्याचे महत्व पटले नव्हते.


आपला मित्र......

रविवार, १४ जून, २००९

चित्रपट: The Straight Story

आज मी The Straight Story हा चित्रपट पहिला. मला तो फार आवडला.

त्यात एक ७३ वर्षांच्या आजोबांना १० वर्षानंतर आपल्या भावाकडून फोन येतो आणि त्यातही त्याला Heart attack आल्याचे कळते. तेव्हा ते स्वतः जाऊन त्याला भेटण्याचे ठरवतात.

त्यांना डोळ्यांनी कमी दिसत असे, जमिनीवरून स्वतः उठता येत नसे, चालतांना दोन काठ्यांचा आधार घ्यावा लागतसे, अश्या परिस्थितीत ते कोणाची हि मदत न घेता Lawn mover (घास कापण्याची मशीन) ने २४० मैलांचा प्रवास करून त्याला भेत्तायचे ठरवतात.

ह्या सर्व प्रवासात त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव, त्यांना भेटलेली माणसे व त्यांच्या कडून ह्यांनी आणि ह्यांच्याकडून त्यांनी शिकलेल्या घोष्टी हे सर्व चांगल्या प्रकारे दर्शवण्यात आले आहे.

ह्यातील एका दृश्यात हे आजोबा दोन भावांना भावान्न मधील नाते समजावताना म्हणतात 'There's no one knows your life better than your brother. He knows who you are & what you are better than anyone on earth' पुढे ते सांगतात मागील वेळेस जेव्हा १० वर्षांपूर्वी मी माझ्या भावाशी भेटलो होतो तेव्हा आमच्यात कधी वाद झाला होता व आम्ही एकमेकांस काही न विसरण्या सारख्या गोष्टी बोलून गेलो होतो. आत्ता मी त्या सर्व विसरून जाऊ इच्छितो व त्याला भेटायला चाललो आहे.

(का माहित नाही पण जेव्हा हा सीन मी बघत होतो तेव्हा मला माझ्या जिवलग मित्राची "संदीप" ची फार आठवण आली व मी रडू लागलो. मला आठवतं जेव्हा मी इथे यायला विमानतळावर होतो तेव्हा त्याचा call आला व तो कसा हमसून हमसून रडत होता कि काही शब्दच फुटत नव्हते.)

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे व पूर्ण चित्रीकरण त्याच वाटेने झाले आहे ज्यांनी Mr. Straight हे आजोबा खरेच गेले होते. आणि हो ह्या चित्रपटातील आजोबांची भूमिका Mr. Richard Farnsworth ह्या ८० वर्षांच्या नटांनी केली.

एकूणच मला हा चित्रपट फार आवडला.

आपला मित्र....

शुक्रवार, ५ जून, २००९

माझी प्रिये.....

२००८ नोव्हेंबर मधल्या एका दिवशी मी ऑफिस मधून रात्रपाळी संपवून घरी येत होतो. माझ्या स्टेशन मध्ये उतरल्यावर पहिला तर तिचे काही sms आले होते. आत्ता नक्की नाही आठवत पण त्यातल्या एकाचा आशय 'तू आल्या पासून माझे जीवन फुलून आले आहे...' इ. असा होता. अत्ता माझ्या सारख्या मुलाला ज्याला तोपर्येंत एकाही मुलीने कधी साधे ढुंकूनही पहिले नाही (कसे कळणार कारण मीही तेव्हडं काही लक्ष नाही द्यायचोना) त्याला जर का असा sms आला तर तो हरखून नाहीका जाणार? माझे हि तेच झाले.

साधारणत दीड महिन्या आधी तिची आणि माझी कामानिमित्ताने ओळख झाली होती. माझ्या कंपनीने ज्या कंपनीला काही काम outsource (ह्याचा मराठी शब्द माहित नाही. क्षमा असावी) केले होते त्याच कंपनीत ती काम करत होती. लहानपणापासून कोणतीही मैत्रीण नसल्याकारणे मिलींशी कसे बोलावे व जवळीक वाढवावी माहित नव्हते, आणि जेव्हा माझाच कलीग ती व इतर काही मुलींशी तासंतास chat करायचा तेव्हा जीव जाळायचा 'कि साला हा एव्हडं काय बोलतो कि ह्या मुली इतक्या ह्याच्याशी बोलतात?'

त्यानंतर एक-दोनदा तिनेच मला chat वर Hi केलं तेव्हा मीही जेवढ्यास तेव्हडे बोललो. पुढे जेव्हा-केव्हा आमची शिफ्ट एकत्र यायची तेव्हा आम्ही chat करू लागलो. बहुतेकवेळा एखाददुसर्या विषयावर चर्चा हि होऊ लागली. हळू हळू मला तिचा online का होईना सहवास आवडू लागला (मी मुंबईत व ती दुसरीकडे असल्या कारणे). मी तिच्या शिफ्टचा track ठेवू लागलो आणि जर का मला सुट्टी असणार तर मी घरून तिच्याशी chat करू लागलो.

काही दिवसांनी माझा वाढदिवस होता. त्या दिवशी पहिल्यांदा मी तिच्या सोबत बोलण्यासाठी तिचा mobile # घेतला व आम्ही काही sms केले. नंतर हळूहळू sms पासून आमची पायरी call करण्यापर्येंत चढली व सुरवातीला काही मिनिटांपासून ते नंतर एक-दोन तासापार्येंत चालू लागे. ह्याच्या आधी व आत्ताही मला खरच नवल वाटते काय बरं म्हणतात हे प्रेमी एवढ्यावेळ (पण खरच सांगू त्यावेळी मला तिचा mobile वर का होईना सहवास हवाहवासा वाटत होता त्यामुळे हे न ते विषय अपोआप सुचायचे).
काही दिवसांनी माझा वाढदिवस होता. त्या दिवशी पहिल्यांदा मी तिच्या सोबत बोलण्यासाठी तिचा mobile # घेतला व आम्ही काही sms केले. नंतर हळूहळू sms पासून आमची पायरी call करण्यापर्येंत चढली व सुरवातीला काही मिनिटांपासून ते नंतर एक-दोन तासापार्येंत चालू लागे. ह्याच्या आधी व आत्ताही मला खरच नवल वाटते काय बरं म्हणतात हे प्रेमी एवढ्यावेळ (पण खरच सांगू त्यावेळी मला तिचा mobile वर का होईना सहवास हवाहवासा वाटत होता त्यामुळे हे न ते विषय अपोआप सुचायचे). आम्ही एवढ्या विविध विषयांवर चर्चा केली कि आत्ता मलाहि नवल वाटतं त्याचं. आतंकवाद, स्त्रीह्क्क, पुरुषप्रधान संस्कृती ते चक्क नवरा बायकोने कसे वागावे इ. विषयांवर आम्ही चर्चा करीत असे.

कालांतराने (म्हणजे फक्त १ ते सवा महिन्यात) तो सुरवातीला सांगितलेला तिचा sms आला होता. (माझी अवस्था तर एखाद्या १ नंबर येणाऱ्या मुलाची result च्या दिवशी असते तशी झाली होती, म्हणजे नक्कीच तोच पहिला येणार ह्याची शाश्वती नसते तेव्हाची.) पण ती स्वतः असे मला काही बोलली नव्हती (सगळ्या मुली अश्याच असतात वाटतं, फक्त संकेत द्यायचे आणि आपण विचारल्यावर 'मी असे कधी बोलले' असे म्हणायचे. असो!).

मग न राहवून मीच तिला २ दिवसांनी घाबरत-घाबरत विचारले (कारण भीती होती कि कुठे असलेली मैत्रीही तुटू नये). तेव्हा ती 'हो' म्हणाली. माझा मलाच विश्वास बसत नव्हता. माझ्यासाठी तर सगळीकडे आनंदी-आनंद झाले होते. एवढा आनंद तर मला डिप्लोमा पास झाल्यानंतरहि झाला नव्हता. मग call मध्ये आम्ही एकमेकांच्या घरच्यांबद्दल माहिती सांगितली. पुढे-पुढे आमच्या बोलण्यात मी अधिकच काळजी घायचो कि कुठे तिला वाईट वाटू नये.

असेच काही अविस्मरणीय दिवस गेले. एके दिवशी तिची night शिफ्ट होती तेव्हा मी तिला call केला तर तिने उचलला नाही. मला वाटले कि असेल काही असेच कारण, मग तिचा sms आला कि ती येणाऱ्या cab चा driver चांगला नसल्या कारणाने तिने call उचलला नाही. नंतर मग एक-दोन दिवस झाले तरी तिचा call आला नाही म्हणून मीच call केला तर तिने कट केला, मला वाटले कि बिझी असेल नंतर call करेल. नंतर तिचा sms आला कि ती कोणत्यातरी tension मध्ये आहे आणि म्हणून तिला काही दिवसांसाठी एकांत हवा आहे. मी तिला म्हटलं कि काही मदत हवी असेल तर मी आहेच.

असाच एक दीड आठवडा गेला असेल. मी परत call करून पहिला तर फोन उचलला नाही वाटलं नंतर करेल पण तिचा call आला नाही. मग ठरवलं कि आपणहून मी तिला call नाही करणार. कारण जेव्हा जेव्हा त्या काही दिवसात जेव्हा जेव्हा मी तिला call केला होता तेव्हा एक तर ती call उचलायची नाही किंवा कट करायची त्यामुळे मला माझा अपमान झाल्यासारखे वाटायचे (अजूनही वाटते).

पुढे पुढे मी तिच्याशी संभाषण कमी करू लागलो आणि तेहि जरका तिचा call आला तरच.

नंतर एकदा ती म्हणाली होती कि तिला वाटत होतं कि आमचं प्रेम (?) प्रकरण पुढे जाऊ शकलं नसता म्हणून ती माझ्याशी दुरावा ठेवू लागली.

आज आम्ही केव्हातरी बोलतो (email द्वारे) तेही जेवढ्यास तेवढे. आम्ही एकमेकांना एकदाही भेटलो नाही. मला माहित नाही कि खरच तिचं माझ्यावर प्रेम होतं का, कि नुसतं खेळत होती माझ्या सोबत.

आम्ही भेटलो असतो तरी हे असाच संपलं असतं ?

माझ्या मनात अजूनही तिच्या बद्दल ओढ आहे. मी जे काही प्रेमाचे क्षण अनुभवले आहेत ते तिच्यामुळे.

आपला मित्र....

रविवार, ३१ मे, २००९

मनातले काही....

काय लिहू बर ?
कुठून सुर्वात करू ?
स्वतः बद्दल लिहू की नको ?
आणि कोणी मला ओळखलं तर ?
पण मग मला ओळखण्याने माझे विचार, मला आलेले अनुभव तर बदलणार नाहीत. हो फक्त एक नक्कीच होईल कि मी लिहिताना एखाद्या दडपणाखाली असणार कि कुठे मी लिहिलेला माझ्या स्वच्छ, मेहनती, हुशार इ. छबीला तडा तर देत नाही न ?

म्हणून मी ठरवलंय कि मी कोण, कुठला, माझे नाव काय असल्या शुल्लक गोष्टी न मांडता फक्त माझे मन मोकळा करत जाईन. ह्यात असेही होईल कि कदाचित मी स्वतःलाच अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेन, मी केलेल्या चांगल्या/वाईट कृत्यांचा तटसस्थ्याच्या भूमिकेतून अवलोकन करू शकेन. एक गोष्ट मात्र नक्कीच असणार ती म्हणजे - वैविध्य, कारण आपल्या विचारांवर ताबा मिळवलेल्यांपैकी मी तर अजून नक्कीच नाही.

पण माणूस खरच एखाद्या विषयाकडे/कृत्याकडे कधी तटस्थपणे बघू शकतो ? असेलही कदाचित...
पण जर त्या विषयामध्ये/कृत्यामध्ये तो सुद्धा सामील असेल तेव्हा ?
आणि जर का त्याच्या मते त्याचीच चुकी असेल तेव्हाही तो प्रामाणिकपणे आपले मत मांडेल ?

माझ्या मते माणूस आपल्या सोयीने एका भूमिकेतून दुसर्यात शिरतो, जेव्हाका त्याला कळतं कि माझ्या चुकी/गुन्हा पेक्षा दुसऱ्याचं चुकी/गुन्हा मोठा आहे तेव्हा लगेचच तो समोरच्याला प्रामानिकतेचे बाळकडू द्यायला सुरवात करतो.

मी कितीतरी वेळा पाहिलंय (व स्वतः वागलोयही) ट्रेन मध्ये जो पर्येंत आपण उभे असतो तो पर्येंत नेहमी विचार करतो कि इतका वेळ झाला तरी बसणारे उठत नाहीत. पण तेच जेव्हा मी स्वतः बसलेला असतो तर असाकाही झोपतो कि आपले station येणार तेव्हाच नेमकी जाग येते. तेव्हा का नाही मला मी उभा असतानाचे हाल आठवत ?

असे कित्येक अनुभव आपण दररोज घेत असतो पण त्यातले केवळ आपल्याला दुखः देणारेच नेमके लक्षात राहतात.


चला आत्ता माझे जेवण करण्याची वेळ झाली आहे. पुन्हा कधीतरी आपले मन मोकळे करीन. अजून पुष्कळ काही सांगायचे आहे.

पुन्हा भेटू.
आपला मित्र