रविवार, ३१ मे, २००९

मनातले काही....

काय लिहू बर ?
कुठून सुर्वात करू ?
स्वतः बद्दल लिहू की नको ?
आणि कोणी मला ओळखलं तर ?
पण मग मला ओळखण्याने माझे विचार, मला आलेले अनुभव तर बदलणार नाहीत. हो फक्त एक नक्कीच होईल कि मी लिहिताना एखाद्या दडपणाखाली असणार कि कुठे मी लिहिलेला माझ्या स्वच्छ, मेहनती, हुशार इ. छबीला तडा तर देत नाही न ?

म्हणून मी ठरवलंय कि मी कोण, कुठला, माझे नाव काय असल्या शुल्लक गोष्टी न मांडता फक्त माझे मन मोकळा करत जाईन. ह्यात असेही होईल कि कदाचित मी स्वतःलाच अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेन, मी केलेल्या चांगल्या/वाईट कृत्यांचा तटसस्थ्याच्या भूमिकेतून अवलोकन करू शकेन. एक गोष्ट मात्र नक्कीच असणार ती म्हणजे - वैविध्य, कारण आपल्या विचारांवर ताबा मिळवलेल्यांपैकी मी तर अजून नक्कीच नाही.

पण माणूस खरच एखाद्या विषयाकडे/कृत्याकडे कधी तटस्थपणे बघू शकतो ? असेलही कदाचित...
पण जर त्या विषयामध्ये/कृत्यामध्ये तो सुद्धा सामील असेल तेव्हा ?
आणि जर का त्याच्या मते त्याचीच चुकी असेल तेव्हाही तो प्रामाणिकपणे आपले मत मांडेल ?

माझ्या मते माणूस आपल्या सोयीने एका भूमिकेतून दुसर्यात शिरतो, जेव्हाका त्याला कळतं कि माझ्या चुकी/गुन्हा पेक्षा दुसऱ्याचं चुकी/गुन्हा मोठा आहे तेव्हा लगेचच तो समोरच्याला प्रामानिकतेचे बाळकडू द्यायला सुरवात करतो.

मी कितीतरी वेळा पाहिलंय (व स्वतः वागलोयही) ट्रेन मध्ये जो पर्येंत आपण उभे असतो तो पर्येंत नेहमी विचार करतो कि इतका वेळ झाला तरी बसणारे उठत नाहीत. पण तेच जेव्हा मी स्वतः बसलेला असतो तर असाकाही झोपतो कि आपले station येणार तेव्हाच नेमकी जाग येते. तेव्हा का नाही मला मी उभा असतानाचे हाल आठवत ?

असे कित्येक अनुभव आपण दररोज घेत असतो पण त्यातले केवळ आपल्याला दुखः देणारेच नेमके लक्षात राहतात.


चला आत्ता माझे जेवण करण्याची वेळ झाली आहे. पुन्हा कधीतरी आपले मन मोकळे करीन. अजून पुष्कळ काही सांगायचे आहे.

पुन्हा भेटू.
आपला मित्र